Wednesday, April 2, 2014

"मराठी माणूस व पाणी"


महोदय,
           
           स. न. वि. वि.

"महाराष्ट्र: संस्कृती व समाज" या विषयावरील १५ वी आंतरराष्ट्रीय परिषद, एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, टेंपे व फिनिक्स, अमेरिका येथे दि. २३ ते २६ एप्रिल २०१४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

 परिषदेचे मुख्य सूत्र: "महाराष्ट्रातील निसर्ग व माणूस ह्यांचे परस्पर संबंध" असे आहे. या परिषदेचे  आमंत्रण मला देण्यात आले असून "मराठी माणूस व पाणी" या विषयावर मी एक  लेख या परिषदेत सादर करणार आहे.

परिषद व अन्य काही कार्यक्रमासाठी मी ६ एप्रिल २०१४ रोजी अमेरिकेस जात आहे. ३ मे २०१४ रोजी मी भारतात परतेन.

 या कालावधीत ई-मेल, फेसबुक, ब्लॉग व संकेतस्थळा द्वारे संपर्कात रहायला अर्थातच आवडेल.
आपल्या माहितीसाठी सविनय सादर.

धन्यवाद.
आदराने,
आपला नम्र,

- प्रदीप पुरंदरे