Monday, April 29, 2019

जलक्षेत्रातील नवीन पिढीपुढील आव्हाने


Publshed in Agrowon on 20.4.2019
 जलक्षेत्रातील नवीन पिढीपुढील आव्हाने
-प्रदीप पुरंदरे*
जलक्षेत्रातील एकत्र कुटुंबपद्धत:
पेयजल, सिंचन व औद्योगिक पाणी वापर हे जलक्षेत्रातील एकत्र कुटुंबाचे सदस्य आहेत. जलक्षेत्रात निसर्गत:च एकत्र कुटुंब पद्धतीला पर्याय नाही. प्रत्येकाने स्वतंत्र राहतो म्हटले तर ते शक्य नाही. पण आजवर या कुटुंबात सिंचनदादाच्या मर्जीनुसार निर्णय झाले. पेयजल, भूजल, मृद व  जलसंधारण आणि लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) ही मंडळी ‘गावाकडची अडाणी भावंडं’ ठरली. त्यांना दुय्यम वागणूक मिळाली. तर औद्योगिक पाणी वापर हा शहरात वा परदेशात स्थायिक झालेला पण शेतीच्या उत्पनाची आशा असणारा आणि म्हणून सिंचनदादाच्या कलाने घेणारा ‘हुशार भाऊ’ निघाला. सिंचनदादा मात्र तमाशाप्रधान मराठी सिनेमातल्या पाटलासारखा आपल्याच गुर्मीत वागत राहिला. कौटुंबिक जबाबदारीकडे पूर्ण दुर्लक्ष करुन उसावर दौलतजादा करण्यात त्याला नेहेमीच पुरूषार्थ वाटला. हा कौटुंबिक विसंवाद टाळून प्रगती करण्यासाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर जलक्षेत्रात पुनर्विचार व पुनर्रचना होणे अत्यावश्यक आहे. नव्हे, त्यांस उशीरच झाला आहे! लक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टि.एम.सी. पाणी आणि कोट्यावधी शहरी व ग्रामीण लाभधारक या भल्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा प्रपंच नेटका करण्यासाठी घरातील नवीन पिढीने आता सूत्रे हातात घेऊन जल- व्यवस्थापन, जल-कारभार आणि जल-नियमनाकडे  लक्ष दिले पाहिजे. या तीन बाबींच्या अभावामूळे राज्याला आज वारंवार आपत्ती व्यवस्थापन करावे लागत आहे. त्याचा काही तपशील या लेखात दिला आहे. हेतू हा की, जलक्षेत्रात  सकारात्मक  बदल व्हावेत.
सिंचनक्षेत्राची व्याप्ती:
महाराष्ट्राने नुकताच एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. त्या जल आराखड्यातील आकडेवारीतून राज्यातील सिंचन क्षेत्र किती अवाढव्य आहे याची कल्पना येते. भूपृष्ठीय पाणी व भूजल (तक्ता -१) असा एकत्रित विचार केला तर राज्यात वापरासाठी एकूण  १,५५,९९७ दलघमी पाणी उपलब्ध आहे. आजमितीला मोठे, मध्यम, आणि राज्यस्तरीय व स्थानिक स्तरावरचे लघु असे एकूण ७१८५  सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असून ७४.५३ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे (तक्ता- २). बांधकामाधीन (१०९९) आणि भविष्यकालीन (५५३) प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्याच्या जलसाठ्यात अजून लक्षणीय भर पडणार आहे. सिंचन प्रकल्पातून विविध गरजांसाठी सध्या एकूण ८६३०१ दलघमी वापर होतो आहे (तक्ता ३) 


नदीजोड प्रकल्प:
राष्ट्रीय पातळीवरील नदीजोड प्रकल्पात एकूण ३० योजना (हिमालयीन घटक-१६, प्रायद्विप घटक-१४) प्रस्तावित आहेत. त्यापैकी प्रायद्विप घटकातील ‘पार-तापी-नर्मदा’ आणि ‘दमणगंगा-पिंजाळ’ हे दोन नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रासाठी मह्त्वाचे आहेत. त्यांच्या बरोबरीने राज्यस्तरावरील ‘नार-पार-गिरणा’, ‘पार-गोदावरी’, ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी’ हे चार नदीजोड प्रकल्प प्रस्तावित आहेत.पश्चिम वाहिनी नद्यातून गुजराथला ‘पार-तापी-नर्मदा’ या नदीजोडसाठी महाराष्ट्राने पाणी द्यायचे आणि तेवढेच पाणी गुजराथने महाराष्ट्राला तापी खो-यात परत करायचे असा ‘बार्टर’ जल-व्यवहारही विचाराधीन आहे.जल आराखड्यात ३४ आंतरराज्यीय प्रकल्प (६०२३ दलघमी), १०५ आंतरखोरे वळण योजना (९२९५ दलघमी)  आणि १८६ खो-यांतर्गत वळण योजना (१५४३४ दलघमी)यांची ही तरतुद करण्यात आली आहे. त्यांचा तपशील अनुक्रमे तक्ता ४, ५ व ६ मध्ये दिला आहे    

स्वागतार्ह भूमिका:
राज्य जल आराखड्यात ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या दोन्ही योजनांना अजिबात हवा दिलेली नाही. तसेच नदीजोड प्रकल्पाबाबतही सबुरीचा सल्ला दिला आहे. या दोन्ही बाबी स्वागतार्ह आहेत.
अवाढव्यसिंचन व्यवस्था वर्षानुवर्षे विविध अडीअडचणींना तोंड देत सुरळितपणे कार्यरत ठेवायची असेल तर त्यासाठी तेवढेच तुल्यबळ जल-व्यवस्थापन (वॉटर मॅनेजमेंट), जल-कारभार (वॉटर गव्हर्नन्स) आणि जल-नियमन (वॉटर रेग्युलेशन) लागणार हे उघड आहे.  त्याबद्दलची वस्तुस्थिती  काय आहे?
जल-व्यवस्थापन
जल-व्यवस्थापन करण्यासाठी जल संपदा विभागाने चांगली मार्गदर्शक सूत्रे व विहित कार्यपद्धती  विकसित केल्या आहेत.पण बहूसंख्य सिंचन प्रकल्पात त्या अंमलात येत नाहीत.प्रकल्प जेवढा लहान तेवढा तो जास्त दुर्लक्षित! असे होण्यामागे अनेक कारणे आहेत.  व्यवस्थापनातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असणे, असलेला कर्मचारी वर्ग प्रशिक्षित नसणे, देखभाल-दुरूस्तीकरिता पुरेसा निधी वेळेवर न मिळणे आणि राजकीय हस्तक्षेप ही नेहेमी सांगितली जाणारी कारणे खरी आहेतच. पण  जल-व्यवस्थापनाबद्दलच्या संकल्पना एकविसाव्या शतकातील आणि सिंचन-व्यवस्था मात्र एकोणिसाव्या शतकातील या विरोधाभासामुळे सगळ्या अडचणी आहेत. आपल्या कालव्यांमध्ये पाणीपातळी व विसर्ग यांच्या नियमनाची तसेच प्रवाह मापनाची आधुनिक व्यवस्था नाही.रियल टाईम डेटा आधारे व्यवस्थापन होत नाही.कालवे आणि वितरण व्यवस्थेवर अभियांत्रिकी नियंत्रण नाही. नवीन संकल्पनांसाठी अनुरुप व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. राज्यस्तरीय प्रकल्पांद्वारे जी साठवण क्षमता निर्माण झाली ती कार्यक्षमरित्या वापरायची असेल तर सिंचन प्रकल्पांचे आधुनिकीकरण करावे लागेल. मराठवाड्यातील माजलगाव प्रकल्पात  कालवा स्वयंचलितीकरणाचा एक प्रयत्न फ्रान्सच्या मदतीने  १९९०च्या दशकात आपण केला होता. गंगामसला शाखा कालव्यावर हायड्रॉलिक पद्धतीने स्वयंचलितीकरण करण्यासाठी Distributors & Weirs आयात करण्यात आली होती. पाणीपातळी व विसर्ग यांच्या नियमनासंदर्भात ती आजही यशस्वी आहेत. पण हे आधुनिकीकरण इतर प्रकल्पात केले गेले नाही.  एक चांगली संधी वाया घालवण्यात आली.

एकोणिसाव्या शतकातील कालवे
बिघडलेली दारे                  शेतक-याने घातलेला तुंब



आधुनिक कालवे
डकबिल विअर                             डिस्ट्रिब्युटर

जल-कारभार
सिंचन प्रकल्पांचा जल-कारभार चालविण्याकरिता आवश्यक असतात कायदे, नियम, अधिसूचना व करारनामे. तेवढयाने भागत नाही. कायदेकानू अंमलात आणण्यासाठी कायद्याने अधिका-यांची नियुक्ति करणे, त्यांची कार्यक्षेत्रे निश्चित करणे व त्यांना अधिकार प्रदान करणे इत्यादी प्राथमिक बाबींची पूर्तता करावी  लागते. महाराष्ट्रात एक नाही, दोन नाही चक्क ९ सिंचन विषयक कायदे आहेत. त्यापैकी आठ कायद्यांना नियम नाहीत. नियम नसणे म्हणजे त्या कायद्याने काहीच विहित नसणे. कायदा अंमलबजावणीचा तपशील नसल्यामूळे कायद्यातील चांगल्या तरतुदी अंमलात येत नाहीत.कायदा अंमलात आणण्याकरिता विविध अधिसूचना काढाव्या लागतात. नदीनाले, लाभक्षेत्रे, अधिका-यांच्या नियुक्त्या व त्यांची कार्यक्षेत्रे, उपसा सिंचन योजना इत्यादि अधिसूचना प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. त्या काढण्याचे काम राज्यात अर्धवट आहे. अधिसूचना नसतील तर संबंधित अधिका-यांना कायदेशीर अधिकार मिळणार नाहीत.मुख्य म्हणजे अधिसूचने अभावी पाणीवापराचा हेतू स्पष्ट होणार नाही. शेतीचे पाणी पळवणे सोपे होईल. कायदेविषयक इतक्या मूलभूत बाबींची पूर्तता केली जाणार नसेल तर पाणी वापरकर्त्यांना पाणी वापराची हकदारी देणार या  बातांना काही अर्थ राहतो का?
सिंचन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर बिगर सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो.या पाणी पुरवठयाला कायदेशीर अधिष्ठान मिळते ते करारनाम्यांमुळे.  ज्यांना पाणी हवे त्या संस्थांनी जल संपदा विभागाशी रितसर  करारनामा करणे अभिप्रेत आहे. त्यात पाणी पुरवठ्याच्या शर्ती व अटी दिलेल्या असतात. पण बहुसंख्य संस्थांशी एकतर करारनामेच केले जात नाहीत. त्यांचे वेळच्या वेळी नुतनीकरण होत नाही. आणि हे सगळे झाले तर त्याची अंमलबजावणी होत नाही. जल संपदा विभागाचे करारनाम्याचे मसुदे खूप जुने म्हणजे २००३सालचे  आहेत. त्यानंतर जलनीती, कायदे आणि पाणी वापर हक्कां संदर्भात खूप बदल झाले आहेत. त्याची नोंद घेऊन त्या मसुद्यात सुधारणा व्हायला हव्यात. 
जल-नियमन:
राज्यातल्या भूजल तसेच भूपृष्ठावरील पाण्याचे आणि पिण्याचे, घरगुती वापराचे तसेच औद्योगिक वापराचे पाणी यांचे  एकात्मिक पद्धतीने नियमन करण्यासाठी आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा)अधिनियम २००५ हा कायदा केला.  कायद्यात एकात्मिक राज्य जल आराखडा आणि एका संस्थात्मक चौकटीची तरतुद करण्यात आली. पाटबंधारे विकास महामंडळांच्या ऎवजी नदीखोरे अभिकरणे, राज्य जल मंडळ, राज्य जलपरिषद आणि मजनिप्रा ही ती चौकट. प्रदीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर एकात्मिक राज्य जल आराखडा नुकताच झाला आहे.  नदीखोरे अभिकरणांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, मजनिप्राने मात्र आता कात टाकली आहे. नदीखोरेस्तरावरील पाणी वाटपात  समन्याय, जल संघर्षांची सोडवणूक, पाणीपट्टी, बिगर सिंचनासाठीचे पाणीवापर हक्क व त्यासाठीचे करारनामे याबाबत मजनिप्राने काही चांगले निर्णय घेतले आहेत. जायकवाडीला आज जे पाणी मिळते आहे ते केवळ मजनिप्रा कायद्याच्या आधारे मिळते आहे हे लक्षात घेऊन मजनिप्राच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित व्यवस्थापन, लोकाभिमुख जलनीती आणि समन्यायाचा आग्रह धरणारे काल-सुसंगत कायदे या आधारे बदल होऊ शकतात. गरज आहे ती पाणी-प्रश्नावरील  लोक चळवळीची.


























तक्ता - १: पाणी –उपलब्धता(दलघमी)
भूपृष्ठीय
              ७५ % विश्वासार्हता
१,३९,५६२
           न्यायाधिकरणाने दिलेले                
१,१५,३२६
पुनरुदभव (Regeneration)
११३१
आयात  (Import)
११,३६६
भूजल
     नक्त उपलब्धतेच्या ७०%                     
२२,६११
फेरवापर (Recycled)
५५६३
वापरासाठी एकूण  उपलब्ध                     
१,५५,९९७
भूपृष्ठीय व भूजल एकत्र धरून (घनमीटर)
                    दर हेक्टरी                                             
७०५८
                     दरडोई                                                  
१२६२


तक्ता -२: सिंचन प्रकल्प(संख्या)                                   
प्रकल्प
पूर्ण
बांधकामाधीन
इतर
भविष्यात
एकूण
मोठे 
४५
६०
८
१
११४
मध्यम
२०२
११७
१
२९
३४९
लघु (राज्यस्तरीय)
२३४३
४१४
४
१७१
२९३२
लघु (स्थानिक र)
४५९५
५०८
०
३५२
५४५५
एकूण
७१८५
१०९९
१३
५५३
८८५०

तक्ता - ३ पाणी वापर (दलघमी)
घरगुती/ पेयजल
६२५३
उद्योग
२००६
सिंचन
६२९३०
निर्यात
१५११२
इकॉलॉजी
०००
.फेरवापर
००००
एकूण
८६३०१

तक्ता ४: आंतरराज्यीय प्रकल्प(Inter-State Projects)
पूर्ण
१८
बांधकामाधीन
१०
भविष्यातील
६
एकूण
३४
उपयुक्त साठा (दलघमी)
५०५६
नियोजित पाणी वापर (दलघमी)
६०२३
महाराष्ट्राचा हिस्सा‘(दलघमी)
४७७४


तक्ता ५: आंतरखोरे वळण योजना(Inter basinDiversion Schemes)
बाब
संख्या
वळविण्यात येणारे पाणी (दलघमी)
एकूण
१०५
९२९५
(सिंचन ५८६९, बिगर सिंचन ३४२६)
हाती घेतलेले
३८
३६३४
भविष्यात्तील
६७
५६६१


तक्ता ६: खो-यांतर्गत वळण योजना(Intra Basin Diversion Schemes)
बाब
संख्या
वळविण्यात येणारे पाणी (दलघमी)
एकूण
१८६
१५४३४
(सिंचन ११४५२, बिगर सिंचन ३९२८)
हाती घेतलेले
१२८
१०५२८
भविष्यात्तील
५८
४९०६


निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...


Published in Agrowon,23.4.2019
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...
प्रदीप पुरंदरे
प्रास्ताविक:
लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत आहेत. तीव्र आणि टोकाच्या घटना, अडचणीचे अवकाळी मुद्दे आणि आरोप-प्रत्यारोपांची गारपिट  अशा एकूण माहोल मध्ये  निवडणुक दुष्काळ खाऊन टाकणार अशीच चिन्हे आहेत. निवडणुक म्हणजे डान्स ऑफ डेमॉक्रसी! लोकशाहीच्या या  नृत्यात दुष्काळ हा केवळ नेपथ्याचा भाग राहू नये.  तो त्या नृत्याचा आशय असावा! मते मागायला येणा-या उमेदवारांना लोक पाणी जरूर मागता आहेत. पण पाणी हा निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा बनलेला नाही. त्याबद्दल सखोल व समग्र चर्चा गांभीर्याने होताना दिसत नाही. ती व्हावी म्ह्णून या लेखात (विस्तारवभयास्त फक्त) सिंचन  प्रकल्पांसंदर्भात काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 
जलनीतीवअग्रक्रम:
महाराष्ट्राची जलनीती २००३ सालची. राष्ट्रीय जलनीतीत २०१२ साली सुधारणा झाल्या आहेत. त्या सुधारणा आणि २००३ ते २०१९ या सोळा वर्षांचा आपला प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊन  राज्य जलनीतीत कालसुसंगत बदल त्वरित करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या वर्षात पाणी वाटपाचे अग्रक्रम आता  क्रमवार (सिक्वेनशियल) पद्ध्ती  ऎवजी प्रमाणवार (प्रपोरशनेट)  पद्ध्तीने ठरवणे उचित होईल. पहिल्या अग्रक्रमाच्या पाणी वापरासाठी पूर्ण तरतुद झाल्याखेरीज दुस-या अग्रक्रमाचा विचार करायचा नाही ही झाली क्रमवार पद्ध्त. तर सर्व पाणी वापरांसाठी पाणी उपलब्धतेच्या प्रमाणात तरतुद करणे याला म्हणायचे प्रमाणवार पद्धत. पाणी उपलब्धता फारच कमी असेल तर क्रमवार अग्रक्रम टाळता येत नाहीत.
क्षेत्रीय पाणी वाटपवउस:
विविध गरजांसाठी या पूर्वी जे क्षेत्रीय पाणी वाटप (सेक्टोरल वॉटर ॲलोकेशन) झाले आहे ते अंतिम! एवढेच नव्हे तर त्या वाटपासंदर्भात न्यायालयातदेखील जाता येणार नाही अशी ‘सुधारणा’ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) अधिनियमात २०११ साली करण्यात आली आहे. जे जनसमूह आणि विभाग विकासप्रक्रियेत नव्याने सामील होतील त्यांच्या मागण्या मान्य करणे त्यामूळे अशक्य होत जाणार आहे. त्यामूळे उपरोक्त ‘सुधारणा’ रद्द करायला हवी. आणि ‘न्यायालयातदेखील जाता येणार नाही’ हे लोकशाही प्रक्रियेत कसे काय बसते?प्रत्येक सिंचन प्रकल्पात शासनाने केलेले क्षेत्रीय पाणी वाटप पुढील प्रमाणे आहे - पेयजल व घरगुती वापर १५ टक्के, औद्योगिक पाणी वापर १० तक्के आणि सिंचन ७५ %. या वाटपात सिंचनासाठी फार मोठी तरतुद केली आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण त्यातील बहुतांशी पाणी उसाला जाणार असेल तर इतर पिकांना पाणी कमीच पडणार हे उघड आहे. 

जलक्षेत्रातील सुधारणा आणि पुनर्रचना:
महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पात अभिप्रेत असलेल्या  जलक्षेत्रातील सुधारणा आणि पुनर्रचना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्या पूर्ण करण्यासाठी खालील बाबी युद्ध पातळीवर अंमलात आणल्या पाहिजेत.
 १.पाटबंधारे महामंडळांचे रुपांतर नदीखोरे अभिकरणात करणे (शासनाला हे तत्वत: मान्य आहे.
पण निर्णय होत नाही) 
२. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सबलीकरण करणे,
३.एकात्मिक राज्य जल  आराखडयाची अंमलबजावणी करणे
नियम, अधिसूचना व करारनामे:
 जल / सिंचन कायद्यांच्या कार्यकारी भागाची (ऑपरेटिव्ह भाग)  पूर्तता न झाल्यामूळे जलक्षेत्रात आज अराजक आहे. कायदे करायचे पण त्याचे  नियम करायचे नाहीत हे ‘पुरोगामी’ महाराष्ट्राला शोभनीय नाही. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ (मपाअ ७६), मजनिप्रा आणि महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९ या कायद्यांचे नियम अनुक्रमे ४३, १४ व १० वर्षे प्रलंबित आहेत. विविध कायद्यांनुसार अधिसूचना व करारनामे या संदर्भातील कारवाईदेखील अर्धवट आहे. महाराष्ट्राची वाटचाल अभूतपूर्व कायदेशीर पेचप्रसंगाकडे होत आहे.
देखभाल-दुरूस्ती व व्यवस्थापन:
बांधुन पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या  देखभाल-दुरूस्ती व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यामूळे लक्षावधी कोटी रूपयांची गुंतवणुक अक्षरश:  वाया चालली आहे. त्याकडे लक्ष दिल्यास अगदी आहे  त्या परिस्थितीतदेखील फार मोठा फरक पडू शकतो.
बांधकामाधीन प्रकल्पात नवीन संकल्पना:
ज्या बांधकामाधीन प्रकल्पांकरिता पाणी  खरेच उपलब्ध होणार असेल आणि जे बांधल्यामुळे इतर कोणाचेही पाणी तोडले जाणार नसेल ते  प्रकल्प - जेथे शक्य असेल तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रकल्पाच्या संकल्पनेत सुधारणा करून - त्वरित पुरे  करायला हवेत
पुनरुज्जीवन व आधुनिकीकरण:
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आधुनिक  तंत्रज्ञाना आधारे कार्यक्षमतेत वाढ होऊन विविध सेवांचा दर्जा सुधारतो आहे. त्या धर्तीवर जुन्या प्रकल्पांचे पुनरुज्जीवन व आधुनिकीकरण आता व्हायला ह्वे.
कोयना, टाटा आणि कृष्णा खो-याचे पाणी:
कोयना व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीज निर्मितीसाठी कृष्णा खो-यातील पाणी कोकणात वळवणे टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.
आठमाही सिंचन:
अवर्षणप्रवणअसलेल्यालाभक्षेत्रातजास्तीसजास्तशेतक-यांनासिंचनाचालाभमिळावायासाठी  राज्यातीलसर्वनवीनप्रकल्पांवरआठमाहीपाणीपुरवठापद्धतसुरूकरण्याचानिर्णय१९८७सालीघेण्यातआला.पण  सन१९८७नंतरप्रकल्पांनादिलेल्याप्रशासकीयमान्यता(प्रमा) वसुधारितप्रशासकीयमान्यतांमध्ये(सुप्रमा) आठमाहीसिंचनधोरणाचाकाटेकोरअवलंबकेलागेलानाही. उलट  अनेकप्रकल्पांतबारमाहीपिकांनाहीमंजूरीदेण्यातआली. त्यामूळेअर्थातचसिंचनातसमन्यायप्रस्थापितहोऊशकलानाही.  एकूणसिंचितक्षेत्रआक्रसले.  शासनाच्याअधिकृतधोरणाचीपायमल्लीझाली.
उपसासिंचनकायद्याच्याकक्षेतआणा:
म.पा.अ.७६ मध्ये उपसा सिंचनाबद्दल ज्यातरतुदी आहेत त्यांची (कलम क्र. ३,८,११,११६) अंमलबजावणी होतनाही.महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ (मसिंपशेव्य) या पाणी वापर संस्थांसाठीच्या कायद्यातीलउपसाविषयक कलमं ३९ ते ५१ शासनानेअद्यापवापरलेलीनाहीत. उपसासिंचनालाजाणीवपूर्वककायद्याच्याकक्षेबाहेर ठेवण्याने पाणी वाटपातल्या विषमतेत भर पडते आहे. उपसा सिंचन योजनांना आता कायद्याच्या कक्षेत आणायला ह्वे.
सिंचन प्रकल्पांचे पुनर्विलोकन:
जलयुक्त शिवार योजना आणि मागेल त्याला शेततळे या योजनांमूळे सिंचन प्रकल्पांचे पाणी कमी होणार असल्यामूळे सिंचन प्रकल्पांचे पुनर्विलोकन करावे..
.........



गोदावरी पाणी तंटा लवादासंदर्भातील महत्वाचे मुद्दे


"गोदावरी खोरे - पाणी वाटप" (संगत प्रकाशन, जानेवारी २०१४) या श्री. या.रा. जाधव, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व माजी विशेष निमंत्रित, म.ज.नि.प्रा. लिखित पुस्तकातील गोदावरी पाणी तंटा लवादासंदर्भातील महत्वाचे मुद्दे

न्या. बच्छावत यांच्या अध्यक्षतेखालील कृष्णा - गोदावरी लवाद मंडळाने अवलंबलेली कार्यपद्धती

तपशील
कृष्णा
गोदावरी
मूळ अहवाल, २७नोव्हेंबर १९७९
आधार
राज्यांकडून आलेली निवेदने/ तक्रारी
राज्यांनी आपसात केलेले करार

निर्णयासाठी ठरविलेले मुद्दे
(Framing of issues)
मुद्दे ठरविले, त्या आधारे राज्यांशी सविस्तर चर्चा केली व निर्णय दिला.
२४ मुद्दे ठरविले. पण त्यावर सविस्तर चर्चा न करता राज्यांत झालेल्या करारांचे संदर्भ देऊन मुद्दे निकाली काढले. निश्चित केलेल्या मुद्यांची नेमकी उत्तरे दिली नाहीत.
पाणी उपलब्धतेची विश्वासार्हता
७५%
(दुस रा कृष्णा लवाद ६५% )
उल्लेख नाही
पाण्याचे परिमाण / उपलब्धता
नेमकेपणा आहे
नेमकेपणा नाही. Quantification केले नाही

खो-यातील पाणी
खॊ-याबाहेर वळविणे
दिलेल्या मुभे व्यतिरिक्त बंदी
कोणताही निर्बंध नाही

पुनर्विलोकनाची तरतुद

आहे
नाही. अशी तरतुद असावी अशी सूचना केंद्र सरकारने केली होती पण राज्य शासनाने आग्रह धरला नाही
सुधारित अहवाल, ७जुलै १९८० (Further Report)
पोलावरम प्रकल्प
महाराष्ट्राला कृष्णा खो-यात १४ टिएमसी पाणी वाढवून मिळाले
गोदावरी खो-यातील अतिरिक्त पाणी कृष्णा खो-यात वळविणे

खॊ-यातील लागवडीयुक्त  क्षेत्राच्या तुलनेत लवादाने महाराष्ट्राला कमी पाणी दिले. त्याचा फटका विशेषत: मराठवाड्याला बसला.


तात्पर्य: गोदावरी खो-यात पाणी वाटपाचे पुनर्विलोकन आवश्यक आहे