प्रेस नोट
गांधी रिसर्च फाऊंडेशन, मानवलोक, अफार्म आणि जैन
इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम विकासासाठी सक्षम जलनीती परिषद दि.२७
व २८ ऑगस्ट २०१४ रोजी मानवलोक, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आली होती. प्रख्यात जलतज्ञ
श्री. राजेंद्रसिंगजी राणा यांनी त्या परिषदेचे उदघाटन केले. महाराष्ट्राच्या जलक्षेत्रातील
अनेक कार्यकर्ते व जल अभ्यासक या परिषदेला उपस्थित होते. त्या परिषदेत श्री. राजेंद्रसिंगजी
राणा यांचे हस्ते खालील पुस्तिका दि.२७ ऑगस्ट २०१४ रोजी प्रकाशित झाली आहे. या
पुस्तिकेत महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम- १९७६,
महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ आणि महाराष्ट्र
जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम-२००५ या कायद्यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे.
________________________________________________________
"विधि"लिखित
महाराष्ट्रातील सिंचन कायदे
लेखक: प्रदीप पुरंदरे
सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी;
पाणी वापर संस्थांचे सदस्य व पदाधिकारी;
कालवा निरीक्षक, दफ्तर कारकुन व मोजणीदार;
शाखा अभियंत्यांपासून जलसंपदा विभागाच्या सर्व स्तरावरील
अभियंत्यांनी आणि
एकूणच समन्यायी पाणी पाणीवाटपाबद्दल आग्रह धरणा-या
सर्वांनी
आवर्जून वाचावी अशी
सिंचन कायद्यांचा लेखाजोखा मांडणारी पुस्तिका
प्रकाशक: मानवलोक, रिंग रोड, आंबेजोगाई
देणगी मूल्य: रू.५०/-
__________________________________________________
पुस्तिका प्रकाशक व लेखकाकडे उपलब्ध आहे. प्रकाशकाचा
पत्ता वर दिला आहे.
लेखकाचा पत्ता: बी - १२, प्राईड टॉवर्स, वेदांत
नगर, औरंगाबाद ४३१००५
मो.क्र. ९८२२५६५२३२
_____________________________________________________
- प्रदीप पुरंदरे
No comments:
Post a Comment