जलयुक्त
शिवार अभियानातील जलसाक्षरतेची जबाबदारी शासनाने जलनायक, जलयोद्धा,जलकर्मी,जलप्रेमी,
जलदूत, जलसेवक आणि जलकर्मी इत्यादींवर टाकली आहे.
दि. ३० नोव्हें २०१६ च्या शासन निर्णयानुसार शासनाला खालील व्यवस्था अपेक्षित आहे असे
दिसते.
तपशील
|
जलकर्मी व जलसेवक
|
जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत
|
कोण आहेत?
|
शासकीय अधिकारी /कर्मचारी
|
अशासकीय व्यक्ती
|
प्रशासकीय जबाबदारी
|
शासकीय अधिकारी /कर्मचारी म्ह्णून योजना अंमलात आणण्याची संपूर्ण प्रशासकीय जबाबदारी
|
काही नाही
|
निवडीचे निकष
|
१. ‘स्वयंप्रेरणेने’ जलसाक्षरतेचे काम करण्यास इच्छुक
२. कामाचा अनुभव गृहित आहे
३. चांगले चारित्र्य
|
१. जलनायक व जलयोद्धा यांना
·
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील
कामकाजाचा अनुभव असावा
· प्राचीन जलसंस्कृतीपासून आधुनिक जलसंस्कृतीची जाण असावी.
२.. चांगले चारित्र्य
|
शासन दरबारी स्थान
|
गृहित धरले आहे
|
मानाचे
|
मोबदला / प्रत्यक्ष खर्चाची प्रतिपूर्ती
|
वेतन व इतर भत्ते
|
काही नाही
|
कामाचे मूल्यमापन
|
विशिष्ट उल्लेख नाही. पण शासकीय नियमानुसार व्हावे असे गृहित
|
विशिष्ट उल्लेख नाही
|
१.उपरोक्त शासन निर्णय ‘जलयुक्त’ राबवणा-या मृद व जलसंधारण विभागाचा
नाही; जलसंपदा विभागाचा आहे.
२.जलयुक्त शिवार अभियानात जलसंपदा विभागाने
‘सक्रिय सह्भाग’ घेण्याबाबत दि. ३१जानेवारी २०१५ रोजी
एक शासन निर्णय झाला होता!
वरील
व्यवस्थेबाबत जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी,
जलदूत, वगैरेंचा स्वत:चा अनुभव काय आहे? त्यांच्याबद्दल
इतरांचा अनुभव काय आहे?
्