Sunday, October 28, 2018

co-operative federalism आणि जायकवाडी



By E mail  and Speed post
प्रदीप पुरंदरे
      सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक,
वाल्मी, औरंगाबाद
दि. २५ ऑक्टोबर २०१८
प्रति,
मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन
तथा
मा.अध्यक्ष, राज्य जल परिषद

विषय: जायकवाडी प्रकल्पा करिता वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत
     
        संदर्भ:  १. जायकवाडी-पाणीवापराचे फेरनियोजन,  शासन निर्णय क्र २०१८(२३६/२०१८) / जसंअ दि.
                     १२.९.२०१८
                  २. जायकवाडी-पाणीवापराचे फेरनियोजन या विषयासंबंधी अध्यक्ष, मजनिप्रा यांना पाठवलेले                                माझे पत्र दि. २७ सप्टेंबर २०१८ (प्रत सोबत जोडली आहे)
                  ३. मजनिप्राच्या  आदेशाचे अनुपालन न करण्याबद्दल शिक्षा करणे या विषयासंबंधी  अध्यक्ष,
                      मजनिप्रा यांना पाठवलेले माझे पत्र दि. २१ऑक्टोबर २०१८ (प्रत सोबत जोडली आहे)
 महोदय,

केंद्र-राज्य संबंध  तसेच राज्याराज्यांमधील परस्पर संबंध  अधिक सौहार्द पूर्ण  व्हावेत आणि नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात यावा या हेतूने  नीती आयोग आणि केंद्रशासन co-operative federalism चा पुरस्कार करत आहेत.महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना शासनाला  co-operative federalism ही संकल्पना मान्य आहे असे सकृतदर्शनी वाटते. ते खरे असेल तर राज्यांतर्गत विविध प्रदेशांमध्येही ती संकल्पना प्रामाणिकपणे राबवायला हवी.  पण मराठवाडा म्हणजे जणू काही शत्रू राज्य आहे असे समजून  पाण्याच्या समन्यायी वाटपाला भाजप-शिवसेनेचे नाशिक-नगर मधील लोक-प्रतिनिधी विरोध करत आहेत ही खेदाची बाब आहे. भाजपाला अति प्रिय असलेल्या नदीजोड प्रकल्पाचे प्रत्यक्षात काय होईल याची झलकच जणू हे लोकप्रतिनिधी आज दाखवत आहेत. वैतरणा आणि / किंवा दमणगंगा- पिंजाळचे पाणी मराठवाड्याला देणार या आपल्या आश्वासनाचे  प्रत्यक्षात काय होईल याचे म्हणूनच भाकित करणे फारसे अवघड नाही. कहर म्हणजे या दोन्ही पक्षांचे मराठवा्ड्यातील लोकप्रतिनिधी शत-प्रतिशत मौन बाळगून आहेत. आपण विशेष पुढाकार घेऊन राज्य जल परिषद कार्यरत केलीत. एकात्मिक राज्य जल आराखडा मार्गी लावलात. मजनिप्राला गती प्राप्त करून दिली. पण त्या मजनिप्राच्या आदेशाला भाजप-शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जुमानत नाहीत हा संदेश सर्वत्र जातो आहे. हर खेतको पानी ही संकल्पना मराठवाड्याला लागू नाही का? लागू असेल तर कृपया खालील तपशील पहावा आणि योग्य ती कारवाई सत्वर करावी ही नम्र विनंती

उर्ध्व गोदावरी खो-यातील नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा या जलसंघर्षासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने  एक महत्वाचा निवाडा दिला आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे:
१. पाणी हे कोणाच्याच मालकीचे नाही. ते एक सामाईक संसाधन  आहे. 
२. राज्यघटनेतील अनुच्छेद ३९ (ख) अन्वये घटनात्मक जबाबदारी शासनाने एका विश्वस्ताच्या भूमिकेतून  पार पाडली पाहिजे.
३. नदीखॊ-यातील उपलब्ध पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. पाणी वाटपात विशेष प्राधान्य कोणत्याही भूभागाला नाही. विशिष्ट पद्धतीने अमूक एवढे पाणी मिळालेच पाहिजे असा दावा कोणालाही करता येणार नाही.
४. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महत्व मार्गदर्शक तत्वांनाही आहे. जल सुशासनात त्यांचेही प्रतिबिंब पडले पाहिजे.
५. पिकसमूह पद्धत (ब्लॉक सिस्टिम) बेकायदेशीर आहे
६. जायकवाडीकरिता वरच्या धरणांतून पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने  १९ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेला आदेश उचित आहे
 ७. जायकवाडीच्या वर नव्याने धरणे बांधु नयेत,
८. टंचाईच्या काळात धार्मिक कारणास्तव पाणी सोडू नये
 . धरणांच्या साठवण क्षमता व जलविज्ञानाचा (हायड्रॉलॉजी) आढावा शासनाने सहा महिन्यात घ्यावा
१०. मजनिप्रा अधिनियमातील कलम क्र ११(ग) व १२ (६) ही कलमे   घटनात्मक दृष्टिने   वैध आहेत.
११.  विश्वस्ताच्या भूमिकेतून समन्यायी पाणी वाटप करणे  शासनास बंधनकारक आहे

मेंढेगिरी समितीने खालील शिफारशी केल्या आहेत (ऑगस्ट २०१३)
१)  दरवर्षी ऑगस्ट महिना अखेरीस पावसाबद्दलचे अंदाज, पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता व उपयुक्त साठा लक्षात घेऊन सप्टॆंबर महिन्याच्या सुरुवातीपासून १५ ऑक्टोबर पर्यंत  जायकवाडीत किमान ३३% साठा  हॊईल अशाप्रकारे वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडावे.
२)   विविध धरणातून पाणी सोडण्यासाठी तक्ता क्र ६ मधील रणनीती क्र.१ प्रमाणे प्रचालन करावे
३)  पिकांच्या शास्त्रीय पद्धतीने काढलेल्या पाण्याच्या गरजा आणि कालवा व विहिर यांचा संयुक्त पाणी वापर विचारात घेऊन खरीप हंगामात  प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पाणीवापर करता येईल.
४)  शेततळी भरून घेणे, लाभक्षेत्राच्या बाहेर सिंचन करणे वगैरे हेतूंसाठी वरच्या धरणातील पाणी कालव्यात, पुर कालव्यात आणि नदीनाल्यात  सोडणे वगैरे बाबी जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतरच करण्यास परवानगी देण्यात येईल.
५)   उर्ध्व गोदावरी खो-यात यापुढे भूपृष्ठावर कोणत्याही प्रकारे पाणी साठे करु नयेत.

मजनिप्राच्या दि. १९ सप्टेंबर २०१४ रोजीच्या  आदेशाची अंमलबजावणी करून  जायकवाडी प्रकल्पाकरिता उर्ध्व गोदावरी खॊ-यातील धरणातून पाणी सोडण्याबाबत उचित कार्यवाही करण्याऎवजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संबंधित अधिकारी हेतूत: खालील बाबी करत आहेत
१. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणीवापराचे अवकाळी  फेरनियोजन करत संभ्रम निर्माण करणे.
२. नाशिक-नगर मधील राजकारण्यांना पाण्यावरून राजकारण करण्याची  तसेच न्यायालयात जाण्याची संधी मिळावी म्हणून किती पाणी सोडणार हे जाहिर करणे  पण ते कधी सोडणार याबाबत मोघम विधाने करणे.
३.  मजनिप्राचे आदेश स्वयंस्पष्ट असताना पाणी सोडण्याबाबत परत मजनिप्राने मार्गदर्शन करावे अशी भूमिका घेत दिरंगाई करण्यासाठी मजनिप्रा या अर्ध-न्यायिक व्यासपीठाचा गैरवापर करणे

पाणी-प्रश्नाबाबत  प्रामाणिक प्रयत्न करणारा आणि त्याच्या सोडवणूकीसाठी भरपूर वेळ देणारा मुख्यमंत्री आणि जल परिषदेचा अध्यक्ष या नात्याने आपण जायकवाडी संदर्भात न्यायोचित निर्णय घ्याल अशी आशा आहे.
धन्यवाद.
आदराने,
आपला नम्र,
प्रदीप पुरंदरे

Sunday, October 21, 2018

मजनिप्राच्या आदेशाचे अनुपालन न करण्याबद्दल शिक्षा करणे


By E mail  and Speed post
प्रदीप पुरंदरे
      सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक,
वाल्मी, औरंगाबाद
दि. २१ऑक्टोबर २०१८
प्रति,
मा.अध्यक्ष,
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण,
मुंबई,
(लक्षवेध: डॉ. सुरेश कुलकर्णी, सचिव)
विषय:  मजनिप्राच्या  आदेशाचे अनुपालन न करण्याबद्दल शिक्षा करणे
संदर्भ:  १. शासन निर्णय क्र २०१८(२३६/२०१८) / जसंअ दि. १२.९.२०१८
                २. जायकवाडी-पाणीवापराचे फेरनियोजन या विषयासंबंधी माझे पत्र, दि. २७ सप्टेंबर २०१८
                 ३. "पाणी सोडण्याबाबत तुम्हीच मार्गदर्शन करा, अधिका-यांची जलसंपत्ती प्राधिकरणाकडे धाव",
                      दिव्य मराठी,औरंगाबाद मध्ये दि.२१.१०.२०१८ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी                
                      (सुलभ संदर्भाकरिता प्रत सोबत जोडली आहे).
महोदय,
 मजनिप्राच्या दि. १९ सप्टेंबर २०१४ रोजीच्या  आदेशाची अंमलबजावणी करून  जायकवाडी प्रकल्पाकरिता उर्ध्व गोदावरी खॊ-यातील धरणातून पाणी सोडण्याबाबत उचित कार्यवाही करण्याऎवजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संबंधित अधिकारी हेतूत: खालील बाबी करत आहेत याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.

१. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणीवापराचे अवकाळी  फेरनियोजन करत संभ्रम निर्माण करणे.
२. नाशिक-नगर मधील राजकारण्यांना पाण्यावरून राजकारण करण्याची  तसेच न्यायालयात जाण्याची संधी मिळावी म्हणून किती पाणी सोडणार हे जाहिर करणे  पण ते कधी सोडणार याबाबत मोघम विधाने करणे.
३.  मजनिप्राचे आदेश स्वयंस्पष्ट असताना पाणी सोडण्याबाबत परत मजनिप्राने मार्गदर्शन करावे अशी भूमिका घेत दिरंगाई करण्यासाठी मजनिप्रा या अर्ध-न्यायिक व्यासपीठाचा गैरवापर करणे

मजनिप्रा च्या दि.१९ सप्टेंबर २०१४ रोजीच्या  आदेशाची अंमलबजावणी करण्याऎवजी अनावश्यक स्पष्टीकरणे मागत तब्बल ५आठवडे  वेळकाढूपणा करण्याचा प्रकार  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी पूर्वी केला होता. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले.  मजनिप्राने त्या वेळी त्या अधिका-यावर कारवाई केली असती तर मजनिप्राच्या आदेशाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ करण्याचे  धाडस अधिका-यांनी परत केले नसते.

या पार्श्वभूमिवर मी आपल्याला नम्र विनंती करतो की, मजनिप्रा कायद्यातील कलम क्र २६ - "या अधिनियमाखालील आदेशाचे अनुपालन न करण्याबद्दल शिक्षा" या वेळी मजनिप्राने आवर्जून वापरावे.

धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,


प्रदीप पुरंदरे







Saturday, October 13, 2018

Water & the Constitution of India – Checks & Balances



Water & the Constitution of India – Checks & Balances
Lists
(Centre-State Relationship)
Articles
Schedules
(State–People Relationship)
State
Concurrent
Union
21
262
48A
51A
11th
12th
Entry 17
Entry 20
Entry 56
Fundamental Right
Adjudication of disputes
Environment, Forest,
 Wild life
Powers of Panchayat
Powers of Nagarpalika
Subject to Entry 56 in the Union List.
“Economic & social planning”
The River Boards Act, 1956
 Right  to Life

ISWD Act 1956
Directive Principle
Basic Duty
Devolution of powers to  Panchayat Raj  Institutions
Provides legislative competence to States, implies executive powers to States & enables them to plan & implement dam projects
By this Entry, major & medium irrigation, hydropower, flood control & multipurpose projects have been subjected to the requirement of Central Clearances* for inclusion in the national plan

RBA Act provides only for the establishment of advisory boards.

Supreme Court of India has recognised the fundamental right to water as integral to the right to life
Adjudication of disputes relating to water of inter-State rivers or river valleys

Allocation of waters & the restrictions imposed by a Tribunal Award
42nd Amendment, 1976


References to the protection of the environment, forests & wild life were introduced via Articles 48A & 51A [& two entries related to forests & wild life were added to the Concurrent List]

73rd &  74th Amendments, 1993

Subjects to be devolved to the panchayats & nagarpalikas. The lists include, inter alia, drinking water, water management, watershed development & sanitation








*The Forest Conservation Act 1980, The Environment Protection Act 1986, The Wild Life (Protection) Act 1972, The Water (Prevention & Control of Pollution) Act 1978


Water and Federalism


Inception Workshop
Centre for Policy Research (CPR), New Delhi  12 October 2018

 Some points for consideration
Pradeep Purandare (1)          
Water is both a State as well as a Central Subject if we consider Entry 17, 56, 20 & Article 262 together. It is important for Centre – State Relationship & Cooperative Federalism. It is perhaps an example of Checks & Balances built in our Constitution & needs to be honoured to avoid excesses at any level.
 It is also necessary to consider Amendments 42, 73 & 74 which provide for State- People-Environment Relationship.
It is expected that WRM strategies of States should be as per their own Soil-Crop-Climate & availability of water. There is nothing wrong in it.
Modern concepts of Water Management, Governance & Regulation (WMGR) demand compatible physical system. Irrigation Systems at present are up-stream controlled, manually operated, mostly open channel systems without any arrangement for canal operation based on Real Time data. As such these systems are not compatible & amenable with the demands of WMGR. Central Govt can play a pivotal role  in modernisation of  irrigation systems.
From WMGR point of view, it is high time to initiate
·       Sub basin-wise Water Courts
·       Basin & National Water Resources Regulatory Authorities                                                              

Pl  see  following attachments for details
1.      Water & the Constitution of India – Checks & Balances
2.      Sub Basin-wise Water Courts
3.      Basin & National Water Resources Regulatory Authorities



Pradeep Purandare, “Making irrigation systems compatible & amenable to modern concepts”,
Round Table on Institutional and Policy Reforms to Accelerate Agriculture Growth in Maharashtra, “Pune International Centre (PIC), Saturday, 1st September 2018 


                                                                                                                        



1)      How do states’ set their WRM strategies and priorities? What are their rationalities and preferences?
2)      What kind of influence do inter-governmental transfers have in shaping/shifting states’ WRM approaches? To what extent? Limits of such an approach?
3)      What kind of incentivization of inter-governmental transfers can help centre influence states’ WRM performance? Are composite metrics (e.g. NITI’s CWMI) useful? What alternatives are possible?
4)      How do central policies, laws and institutions impact WRM preferences of states? What better ways of deploying these instruments?