By E mail and
Speed post
प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक,
वाल्मी, औरंगाबाद
दि. २१ऑक्टोबर २०१८
प्रति,
मा.अध्यक्ष,
महाराष्ट्र जलसंपत्ती
नियमन प्राधिकरण,
मुंबई,
(लक्षवेध: डॉ. सुरेश कुलकर्णी, सचिव)
विषय: मजनिप्राच्या आदेशाचे अनुपालन न करण्याबद्दल शिक्षा करणे
संदर्भ: १. शासन निर्णय क्र २०१८(२३६/२०१८)
/ जसंअ दि. १२.९.२०१८
२. जायकवाडी-पाणीवापराचे
फेरनियोजन या विषयासंबंधी माझे पत्र, दि. २७ सप्टेंबर २०१८
३. "पाणी सोडण्याबाबत तुम्हीच मार्गदर्शन करा, अधिका-यांची जलसंपत्ती प्राधिकरणाकडे धाव",
दिव्य मराठी,औरंगाबाद मध्ये दि.२१.१०.२०१८ रोजी प्रसिद्ध
झालेली बातमी
(सुलभ संदर्भाकरिता प्रत सोबत
जोडली आहे).
महोदय,
मजनिप्राच्या दि. १९ सप्टेंबर २०१४ रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करून जायकवाडी प्रकल्पाकरिता उर्ध्व गोदावरी खॊ-यातील
धरणातून पाणी सोडण्याबाबत उचित कार्यवाही करण्याऎवजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास
महामंडळाचे संबंधित अधिकारी हेतूत: खालील बाबी करत आहेत याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.
१. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणीवापराचे अवकाळी
फेरनियोजन करत संभ्रम निर्माण करणे.
२. नाशिक-नगर
मधील राजकारण्यांना पाण्यावरून राजकारण करण्याची
तसेच न्यायालयात जाण्याची संधी मिळावी म्हणून किती पाणी सोडणार हे जाहिर करणे पण ते कधी सोडणार याबाबत मोघम विधाने करणे.
३. मजनिप्राचे आदेश स्वयंस्पष्ट असताना पाणी सोडण्याबाबत
परत मजनिप्राने मार्गदर्शन करावे अशी भूमिका घेत दिरंगाई करण्यासाठी मजनिप्रा या अर्ध-न्यायिक
व्यासपीठाचा गैरवापर करणे
मजनिप्रा च्या
दि.१९ सप्टेंबर २०१४ रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी
करण्याऎवजी अनावश्यक स्पष्टीकरणे मागत तब्बल ५आठवडे वेळकाढूपणा करण्याचा प्रकार गोदावरी मराठवाडा
पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी पूर्वी केला होता. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर
पाणी वाया गेले. मजनिप्राने त्या वेळी त्या
अधिका-यावर कारवाई केली असती तर मजनिप्राच्या आदेशाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ करण्याचे धाडस अधिका-यांनी परत केले नसते.
या पार्श्वभूमिवर
मी आपल्याला नम्र विनंती करतो की, मजनिप्रा कायद्यातील कलम क्र २६ - "या अधिनियमाखालील आदेशाचे अनुपालन
न करण्याबद्दल शिक्षा" या वेळी मजनिप्राने आवर्जून वापरावे.
धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,
प्रदीप पुरंदरे
No comments:
Post a Comment