Wednesday, June 3, 2020

वडनेरे समिती-१ व २ च्या शिफारशी



वडनेरे समिती-१ ने २००७ साली केलेल्या शिफारशी तेरा वर्षे अंमलात आल्या नाहीत. का नाही होणार पूर नियमनाचे तीन तेरा?
प्रदीप पुरंदरे
वडनेरे समिती-१ ने आपला अहवाल शासनास  २२ मे २००७ रोजी सादर केला. त्यात एकूण ४४ शिफारशी होत्या. शासनाने वडनेरे समितीचा अहवाल दि. ६ एप्रिल २०११ रोजी म्हणजे तब्बल चार वर्षानी स्वीकारला. चव्वेचाळीसपैकी ४० शिफारशी स्वीकारल्या. तसा शासन निर्णय ही निर्गमित केला. पण गेल्या तेरा वर्षात अंमलबजावणी शून्य! जाणकारांच्या मते फक्त शासन निर्णय काढून भागत नाही. प्रत्येक शिफारस नक्की कशी अंमलात आणायची याबद्दल मार्गदर्शन करणारा  तपशीलवार आदेश महत्वाचा. तोच काढला नाही.
वडनेरे समिती-१ व २ च्या शिफारशी खाली दिल्या आहेत. त्या  शिफारशींची वर्गवारी  चार भागात केली आहे. ती  पुढील प्रमाणे- (१) सर्वसाधारण,(२) नदीपात्रातील अतिक्रमणे,(३) जलाशय प्रचालन आणि (४) एकात्मिक जलाशय परिचालन सूची.

वडनेरे समिती-१
शिफारस क्रमांक मूळ अहवालानुसार
वडनेरे समिती-२
सर्वसाधारण:

३८ जल संपदा विभागात जलशास्त्रज्ञांची (Hydrologists) नेमणूक करा

२० एकात्मिक जलाशय परिचालन (Integrated Reservoir Operation) करण्याच्या दृष्टिने धरण सुरक्षा नियम पुस्तिका खंड- (Dam Safety Manual, Ch-7) मध्ये त्वरित सुधारणा करण्यात  यावी

२४ पूर-पूर्वानुमान (Flood forecasting) व जलसंपदा अंदाजातील चूका टाळण्य़ासाठी पातळी-विसर्ग (Stage Discharge Curve ) मोजण्यात येणा-या सर्व स्थानांकरिता क्षेत्रिय प्रकल्प अधिका-यांनी वार्षिक प्रमाणी आलेख (Rating Curve) तयार करावा
·     रेटिंग कर्व्हज सुधारा त्यांचा केंद्रिय जल आयोगाच्या कर्व्हज  बरोबर मेळ घाला,
·     नदी-विसर्ग (River Gauging Stations) आणि पर्जन्य मापन केंद्रांचा (Rain gauge Stations) दर्जा वाढवा,
·     मुक्त पाणलोटाकरिता (Free catchment) तशी केंद्रे नव्याने स्थापन करा,
·     नद्या व उपनद्यांचे सर्वेक्षण करा, त्यांची प्रत्यक्ष वहन-क्षमता निश्चित करा
·     लोकसहभाग आणि शासनाचे अन्य संबंधित विभाग यांच्या समितीमार्फत नद्यांची मान्सून-पूर्व पहाणी करा
नदीपात्रातील अतिक्रमणे:

२५ तीव्र पूर प्रवण क्षेत्रातील नदीपात्रातील अतिक्रमणे नियंत्रित करण्यासाठी निषिद्ध क्षेत्र (निळी रेषा) व निर्बंधित क्षेत्र (लाल रेषा) याची आखणी प्राथम्याने करावी
·     सुधारित पूर-रेषांची आखणी करा
३२ नद्या / नाल्यांच्या पुनर्प्रापणाची(Reclamation)  परवानगी देऊ नये. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कडक निर्बंध असावेत
·     पुराचा धोका असलेल्या भूभागाचे नकाशे प्रकाशित करा
·     नदीनाले स्वच्छ करा , त्यावरील अतिक्रमणे हटवा, नवीन  अतिक्रमणे रोखा
·     नदी पात्र पुनर्प्रस्थापित करणे,
·     निम्न पातळीवरील नदीतीर उंचावणे,
·     नदी सरळ करणे
३१ पुलांमुळे येणारा फुगवटा कमी करण्य़ासाठी नद्यांवरील नवीन पूलांच्या संकल्पनेत सूधारणा कराव्यात   
·     जलशास्त्रीय प्रतिकृती अभ्यास, नदीपात्रातील बांधकामांचे जलशास्त्रीय लेखा परिक्षण
४४ को.प. बंधारे बांधणा-या  यंत्रणांना परावृत्त करावे.येणारा फुगवटा कमी करण्य़ासाठी नद्यांवरील बंधा-यांच्या संकल्पनेत  सुधारणा कराव्यात   

जलाशय प्रचालन                     

२ जलाशय भरण्याची खात्री असल्यास ते खूप लवकर पूर्ण संचय पातळी पर्यंत भरू नयेत.
·       जलाशय प्रचालनाचा आढावा घ्या. RTSF & ROS मध्ये सुधारणा करा.
·       पूर-पूर्वानुमान यंत्रणा, एकात्मिक जलाशय प्रचालन, आपत्ती व्यवस्थापन,इत्यादीत तज्ज्ञता प्राप्त करा
·       पाऊस, जलाशय प्रचालन आणि त्याकरिता घेतलेले निर्णय या  तपशीलाचे दस्तावेजीकरण करण्यात यावे. त्याचे जतन करावे. मुख्य अभियंता, खोरे-प्राधिकरण यांनी ते तपासावे. सुधारणा सुचवाव्यात
    जलाशय प्रचालन अहवाल प्रस्तुतीकरण व   
    लेखा परीक्षण


३ बहुतेक धरणे बहूउद्देशीय- जलाशय परिचालन करताना जलसाठयाच्या सामाईक पाणी वापराची तत्वे विचारात घ्यावीत
४ पूरनियंत्रण आणि विविध गरजांसाठी पाणी साठा ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जलाशय परिचालन लवचिक पद्धतीने करावे
६ दारे असलेल्या प्रत्येक धरणासाठी जलाशय परिचालन सूची (Reservoir Operation Schedule (ROS)  द्वार परिचालन सूची (Gate Operation Schedule (GOS ) तयार करावी. आर ओ एस, जी ओ एस आणि सक्षम पूर्वानुमान यंत्रणा उभारून पावसाळ्याअंती धरण हमखास भरेल आलेख ह्याची सुनिच्छितता करावी
   महापूराच्या वेळी सांडव्याचा विसर्ग ठरविण्यासाठी जी ओ एस तयार करावे


७ नियामी आलेख (Guide Curves)
   पूर नियमन आणि पाणी वापरासाठी जलसाठा ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियामी आलेख महत्वाचे.
   सर्वसामान्य येवा असताना जलाशय पातळी महत्तम नियामी आलेखानुसार ठेवावी (Upper Guide Curve)
   पूर सामावून घेण्यासाठी जलाशय पातळी तात्पुरती निम्न नियामी आलेखापर्यंत खाली आणावी.
   पूर सामावून घेत  जलाशय पातळी वाढवावी. महापूराच्या वेळी काही काळ ती पूर्ण संचय पातळीपेक्षा (FRL) जास्त पण महत्तम जल पातळी(MWL)पेक्षा कमी ठेवावी. या साठी सक्षम पूर्वानुमान यंत्रणा आवश्यक

८ पाणलोटात अतिवृष्टी / अति तीव्र येव्याचा इषारा असल्यास महापूर समयी आपत्कालिन आर ओ एस वापरावे. पूर्ण संचय पातळीच्या वर  काही काळासाठी पाणी पातळी नेता येईल
९ भराई (Filling)  व रिक्तन(Depletion) कालावधी
  करिता स्वतंत्र नियामी आलेख असावेत. भराई करिता  
  महत्तमनिम्न नियामी आलेख. रिक्तनसाठी एक .
१७ कोयनेचे नियामी आलेख  पद्धत -ड आधारे   
    बनवावेत

एकात्मिक जलाशय परिचालन सूची

२७ जलाशयाच्या समूहासाठी खोरे/उपखोरे यांना एकक मानून एकात्मिक जलाशय परिचालन सूची तयार करावी. एक खॊरे/एक अधिकरण हे तत्व लागू करावे
·         पाऊस, जलाशय प्रचालन आणि त्या करिता घेतलेले निर्णय या तपशीलाचे दस्तावेजीकरण करण्यात यावे. त्याचे जतन करावे. मुख्य अभियंता, खोरे-प्राधिकरण यांनी     ते तपासावे.
·         पूर-पूर्वानुमान मॉडेल्स विकसित करा,
·         रियल टाईम डाटा एक्विझिशन यंत्रणा जास्त व्यापक व सघन करा,
·         डॉपलर रडार बसवा,
·         निरीक्षण-साखळ्यांचे एकात्मिकरण करा,
·          विशिष्ट भूभागासाठी उपग्रहाद्वारे नेमकी माहिती प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करणे,
·         नदीखॊरे स्तरावर एकात्मिक पूर-व्यवस्थापन करण्यासाठी यंत्रणा   विकसित करा, पूर-व्यवस्थापनासाठी कायदा करा

२९ रियल टाईम फ्लड फ़ोरकास्टिंग यंत्रणा  ५ वर्षात पूर्ण करावी. जल शास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, इलेक्ट्रॉनिक्स ऍंड टेलिकम्युनिकेशन तज्ज्ञ आणि स्थापत्य असलेला संघ आवश्यक
३५ आंतरराज्यीय नद्यांसाठी संबंधित राज्यांबरोबर माहिती देवाण-घेवाण यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावी
समन्वय वाढविणे
३६ जलहवामान व्यूहाचे (hydrometeorology)  अद्ययावतीकर करण्यासाठी  स्वतंत्र अर्थसंकल्पिय तरतूदी करावी         

३७ पूरप्रवण क्षेत्रा्तील महत्वाच्या केंद्रांची जलहवामान माहिती आर टि डि ऎस द्वारे देण्याचे काम पाच वर्षात पूर्ण करावे

३९ हाय रिझोल्यूशन डॉपलर यंत्रणा रत्नागिरी व औरंगाबाद येथे स्थापन करणे

४० जलाशयाच्या परिचलना संबंधी  डाटा बेस मॅनेजमेंट कार्यान्वित ठेवणे 

४१ पूर पूर्वानुमान यंत्रणा, एकात्मिक आर ओ एस ,इत्यादी संबंधीची कामे पावसाळ्या व्यतिरिक्त ही चालू ठेवावीत

४२ जलविज्ञान  प्रकल्प जल व्यूहातील (hydrological Network )माहितीचा व्यापक प्रमाणात वापर करावा.

४३ धरणाची ऊंची वाढवून पूर नियंत्रण साठयाकरिता स्वतंत्र जागा राखून ठेवावी. 
महापूर रोखायचा असेल तर
·  स्वतंत्र पूर-धरणे बांधा.
·  पूर-बोगदे काढून पाणी दुष्काळी भागाकडॆ वळवा.
·  धरणांची उंची वाढवा. दारे नसलेल्या धरणांवर दारे लावा.
·  ज्या धरणांवर दारे आहेत त्या दारांना फ्लॅप लावून त्यांची उंची वाढवा.
·   नद्यांच्या दोन्ही तीरांवर बांध घाला.
·   राधानगरी धरणावरची   स्वयंचलित दारे  काढून तेथे इतर  धरणांवर बसवतात तसली  दारे बसवा.
·   कृष्णा नदी फारच वेडीवाकडी वाहते. तीला एकदा "सरळ" केली पाहिजे.
आलमट्टी धरणा बाबत शिफारस नाही
·     अलमट्टी व हिपरगी यांच्या पूर प्रचालनामुळे महाराष्ट्राच्या पूरपरिस्थिवर थेट व विपरित परिणाम होत नाही                
·     काही क्षेत्रीय माहिती नव्याने प्राप्त करून पुन्हा अभ्यास करावा

   Maharashtra State Climate Change Adaptation Policy 2017 परिणामकारकरित्या राबवणे

   फ्लड प्लेन व झोनिंग नियम कोल्हापूर व सांगली  जिल्ह्यात लागू करणे  



No comments:

Post a Comment