First they came for the Socialists, and I did
not speak out—
Because I was not a Socialist.
Then they came for the Trade Unionists, and I
did not speak out—
Because I was not a Trade Unionist.
Then they came for the Jews, and I did not
speak out—
Because I was not a Jew.
Then they came for me—and there was no one left to speak
for me.
एका जर्मन कवीची ही
सुप्रसिद्ध कविता. नाझी भस्मासुराचा उदय होत असताना बुद्धिवाद्यांची भूमिका व वर्तणुक
नेमकी कशी होती या वरचे हे काव्यात्मक भाष्य.
गौरी लंकेशच्या हत्येचं
निमित्त झालं आणि जलक्षेत्रातील आजच्या संदर्भात
त्या कवितेचं प्रतिबिंब मला असं दिसलं.
प्रथम त्यांनी सिंचन
घोटाळा केला
मोठ्या प्रकल्पांचा बट्याबॊळ झाला
मी गप्प बसलो
कारण मी मोठ्या प्रकल्पांचा
समर्थक नव्ह्तो
मग त्यांनी लघु प्रकल्प
संपवले
मी गप्प बसलो
कारण मी लघु प्रकल्पांचा
समर्थक नव्ह्तो
मग त्यांनी पाणलोटाचा
बळी घेतला
मी गप्प बसलो
कारण मी पाणलोट विकासाचा
समर्थक नव्ह्तो
मग त्यांनी पळवलं
शेतीचं पाणी
मी गप्प बसलो
कारण मी शेतकरी नव्ह्तो
मग त्यांनी पार जलधरच
उघडे पाडले
बोअर घेतले उभे आडवे
जमीनीची चाळण केली
टॅंकर चालवले छाताडावर
नदीनाले प्रदुषित
केले
वाळू विकली
जलस्त्रोत बुजवले
पाणी बाटलीबंद केले
नद्या जोडल्या तोडल्या
वाट्टेल तशा
समुद्र आटवले
जंगले उध्वस्त केली
उस-बाधा झाली त्यांना
साखर-करणी केली त्यांनी
आता जलवाहतुक करणार
आहेत ते
कोरड्या नद्यातून
मी गप्प बसलो
कारण मी पर्यावरणवादी
नव्ह्तो.
आता त्यांचा मोर्चा
माझ्याकडं वळला आहे
आणि माझ्याबरोबर कोणीच नाही
.
.
.
पाण्यावरून होणा-या
दंगलीत मी कदाचित मारला जाईन
किंवा स्मार्ट सिटी
मधील
मॅनहोलमध्ये
मला मिळेल स्मार्ट
जलसमाधी
------------------------------
प्रदीप
पुरंदरे
(६ सप्टेंबर
२०१७)
No comments:
Post a Comment