"बिहार, यूपीला जे जमते
ते महाराष्ट्राला का नाही? पीडब्ल्यूडी, जलसंपदावर आयएएस? मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका" ही दै. लोकमत, औरंगाबाद (१८.९.२०१२)
मधील बातमी वाचली आणि जखमेवरची खपली निघाली.
"सिंचनाबद्दल आता कोणी
स्पष्ट बोलेल काय?" (४ फेब्रुवारी १९९०) व "पाण्यासाठी दाही दिशा"
(४ मार्च १९९०) हे लेख मी दै. मराठवाडयात "सिंचन नोंदी" या सदरात लिहिले
होते.
पाटबंधारे विभागाच्या दोन्ही
सचिव पदी आय.ए.एस.अधिकारी नेमावेत आणि
सिंचनाबद्दल श्वेतपत्रिका काढावी
या मागण्या मी त्या लेखात १९९० साली केल्या होत्या.
बावीस वर्षे झाली!
फक्त बावीस!!
.
.
.
जीवनात योगायोग मोठे विचित्र
असतात.
दै.मराठवाडयात १९९० साली निशिकांत
भालेराव व जयदेव डोळे या दोघांनी सिंचन नोंदींवर संपादकीय संस्कार केले होते.
डिसेंबर २०११ मध्ये जेव्हा मी
वाल्मीतून स्वेच्छा सेवा निवृत्ती घेतली तेव्हा
निशिकांत भालेराव साप्ताहिक
"आधुनिक किसान" औरंगाबाद येथून सुरू करत होते.
मी त्यात पहिल्या अंका पासून
"लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे" हे सदर लिहितोय.
"जलसंकट निवारण नव्हे, निर्मूलन हवे!"
(१२ जूलै २०१२) व
"दुष्काळ: एक इष्टापत्ती!"
(६ सप्टेंबर २०१२)
या त्या सदरातील लेखात मी परत
त्याच मागण्या केल्या आहेत
ज्या बावीस वर्षांपूर्वी केल्या
होत्या.
.
.
काय म्हणावे?
"बघा! मी सांगितले होते!!"
म्हणून श्रेय घ्यायचे?
आपले म्हणणे आपण समाजाला पटवून
देण्यात कमी पडलो म्हणून खंत बाळगायची?
का अनुल्लेखाने मारले, दूर्लक्ष केले,
इत्यादी टिका करून हताश होऊन गप बसायचे?
असो.
.
.
.
मराठवाडयात आज दुष्काळ पडला
आहे.
जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडा ही मागणी होते आहे.
बंद दरवाजावर धडका देणे सुरू
आहे.
.
.
.
"सामाजिक अपयश हे वैयक्तिक
अपयश मानायचे नसते, आपण आपले प्रयत्न करत रहायचे"
असे म्हणून कोणतीही अपेक्षा
न बाळगता
तीस तीस वर्षे संघर्षरत राहणा-या
कार्यकर्त्यांबरोबर
व त्यांच्या कार्याबरोबर जोडून
घेतो आहे.
तसा उशीरच झाला.
देर आये, दुरूस्त आये!
.
.
बापुसाहेब उपाध्ये, विलासराव साळुंखे,
दता देशमुख, मृणाल गोरे....ज्योतिबा,
तुमच्या रूंद व सशक्त खांद्यावर
उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत...
बळ द्या. लढ म्हणा.
.
.
सगळेच संदर्भ बदलतात असे नाही.
जुन्यातून जी निष्पत्ती नवी
काय नव्हे ती श्रेयस्कारक?
This comment has been removed by the author.
ReplyDelete