दि.१७ ऑगस्ट २०१२
प्रिय संपादक,
नांदूर मधमेश्वर सिंचन प्रकल्पाच्या जल व्यवस्थापनाचे काम पाहणा-या अभियंता मित्रांना झालेली मारहाण निंदनीय आहे. जल
व्यवस्थापन व सिंचन कायदा या विषयांचा एक अभ्यासक म्हणून मी त्या घटनेचा निषेध करतो.
पण सिंचन कायद्याची अंमलबजावणी न करणे आणि कालवा अधिकारी म्हणून स्वत:चे कायदेशीर अधिकार न वापरणे यामूळे अधिका-यांचा दरारा
व वचक राहिलेला नसल्यामूळे असे प्रकार होतात हे कसे नाकारता येईल? जल क्षेत्रात कायद्याचे राज्य नसल्यामूळेच पाणीचोर शिरजोर झाले आहेत!
- प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
No comments:
Post a Comment