Tuesday, July 5, 2016

सिमेंट नाला बांध व नाला खोलीकरण : मार्गदर्शक सूचना


महत्वाचे शासन निर्णय व त्यातील कळीचे मुद्दे

अ.क्र.
महत्वाचे शासन निर्णय
कळीचे मुद्दे 
ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र. जलस १०९५ / प्र. क्र.२५० / जल -७
 दि. ३० जानेवारी १९९६

जलसंधारण कार्यक्रमांतर्गत "एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याबाबत
गेल्या ३ वर्षात जलसंधारण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये जलसंधारण या संकल्पनेला(पाणी दिसणे) जादा महत्व देऊन, मृदसंधारणाच्या प्रक्रियेकडे(पाणी मुरणे) दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. नालाबंडिंग, सिमेंट बंधारे यांच्या बरोबरच मृदसंधारण, समपातळी चर, वृक्ष लागवड याबाबींकडे जितक्या प्रमाणात लक्ष देणे व त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते, त्या प्रमाणात लक्ष केंद्रित झालेले नाही, असे आढळून आले आहे. याशिवाय जलसंधारणाची कामे करताना नालाबंडिंग, भूमिगत बंधारे, गॅबीयन बंधारे यांसारखी बांधकामे करताना त्या जागा  जलपुनर्भरणासाठी योग्य आहेत की नाहीत ही बाब तपासून घेण्याची आवश्यकता असतानासुद्धा या बाबीकडे योग्य प्रमाणात लक्ष दिले गेलेले नाही....
कार्यक्रमाची वैशिष्टये
(ब) (१) श्रमदान
       (२) "मागे वळून पहा"--(गावातून बाहेर गेलेल्या गावक-यांनी गावासाठी काही तरी करणे या   अर्थाने)
(ड) .......कामाचे प्रकार
      (इ) नाला काठ स्थिरीकरण
जलसंधारण विभाग
क्र. राकृयो - २०११ /  प्र. क्र. ७२ / जल-७ दि. ९ मे २०१३
अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण करणे तसेच खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बांधणे: मार्गदर्शक सूचना
) नाला खोलीकरण या योजनेचा मुख्य हेतू भूपृष्ठीय साठवण नसून भूजल पुनर्भरण हा आहे
२) महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ९६% कठीण पाषाण( Basalt 92% + Metamorphic म्हणजे रुपांतरीत पाषाण 4%)   आहे व ४% भूभाग गाळाचा प्रदेश (Alluvial terrain) आहे
३) नाला खोलीकरणासाठी कठीण पाषाणात खोदकाम करू नये म्हणजेच मुरूमाच्या थराखाली खोदकाम नसावे. कारण या उपाययोजनेद्वारे भूस्तरावरील उथळ जलधारक पुनर्भरित करणे हा उद्देश आहे. कठीण पाषाणाची जलधारक क्षमता अत्यंत कमी असल्याने तसेच त्यातून जमिनीखाली पाणी झिरपण्याची गती अत्याधिक मंद असल्याने कठीण पाषाणात खोदकाम केल्यास योजनेचा खर्च फार जास्त होईल, तुलनेत पुनर्भरण नगण्य स्वरूपाचे होईल.
४) गाळाच्या प्रदेशात नाला खोलीकरणाचे काम हाती घेणे योग्य नाही. कारण अशा ठिकाणी clay चा थर impervious असल्यामूळे सदर पाणी जमिनीत मुरून भूजलामध्ये रूपांतरीत होणार नाही.
५) गाळाच्या भागातील "बझाडा" भूस्तराचा भाग boulders (लहानमोठे टोळदगड) व silt यापासून बनलेला आहे. त्याची जलग्रहण क्षमता जास्त आहे. नाला खोलीकरण उपाययोजना येथे राबविण्यात यावी.
१) भौगोलिक रचनेचे वर्गीकरण  वहनक्षेत्र (Runoff zone), पुनर्भरण क्षेत्र(Recharge zone)  आणि साठवण क्षेत्र (Discharge zone) अशा प्रकारे  केले जाते.
२) वहनक्षेत्रातील नाल्यांना प्रथम श्रेणीचे(First order), पुनर्भरण क्षेत्रातील नाल्यांना द्वितीय श्रेणीचे (Second order) व तृतीय श्रेणीचे(Third order)  आणि साठवण क्षेत्रातील नाल्यांना  चतुर्थ श्रेणीचे (Fourth order) नाले असे म्हणतात.
नाला खोलीकरण हे फक्त द्वितीय श्रेणीच्या (Second order) व तृतीय श्रेणीच्या (Third order) नाल्यांवरच करण्यात यावे. (आकृती क्र १ व तक्ता क्र.२)








आयुक्त,कृषि, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक
जा.क्र. मृदसं / मृद -६ / सिनाबां / नाखो / ११५९ / १३ दि. २१ मे २०१३
१)उपलब्ध अपधावेच्या मर्यादेत राहूनच (within limits of calculated runoff) नाला खोलीकरणाची लांबी ठरवावी.
२)ज्या ठिकाणी नालापात्रात वाळू साठा आहे अशा नाल्यांचे खोलीकरण करू नये
३) ज्या ठिकाणी नालापात्रांची नैसर्गिक खोली ३ मीटर पेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी खोलीकरणासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे मार्गदर्शन घ्यावे.
४) नाला खोलीकरणाची कमाल मर्यादा नाला तळापासून ३ मीटर असावी
५) अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये खोलीकरणाची कामे (वर नमूद केलेली पथ्ये पाळत) अग्रक्रमाने करावीत
१) उपलब्ध अपधावेच्या मर्यादेत राहूनच (within limits of calculated runoff) नाला खोलीकरणाची लांबी ठरवावी. नाला बांधाची उच्चतम पुर पातळी नाल्याच्या वरच्या बाजूस ज्या ठिकाणी छेदते तेवढ्या लांबी पर्यंत खोलीकरण करावे
२) कोणत्याही परिस्थितीत नाला तळाच्या मूळ  रूंदीपेक्षा जास्त रूंदीकरण करू नये. जेणेकरून नाल्याच्या काठास बाधा पोहचणार नाही
३) खोलीकरण करताना नालाकाठास १: १/२ एवढा उतार (side slope) ठेवावा.खोलीकरणातून निघालेली माती १ मीटर बर्म सोडून नालाकाठावर टाकावी. नालाकाठावर टाकलेल्या मातीपासून तयार होणा-या बांधास दोन्ही बाजूस १:१असा उतार द्यावा. बांधाची माथा रूंदी १ मीटर ठेवावी. बांधाची उंची निघणा-या परिमाणाचा विचार करून ठेवावी. जास्तीची माती अन्यत्र लांब टाकावी.
४) नाल्यातील गाळ काढताना बांधाच्या पुढील बाजूस (up stream) बांधापासून ५ मीटर बर्म सोडावा व बर्मलाअ पुढील बाजूस १:१.५ उतार ठेऊन त्यांस दगडी अस्तरीकरण करावे.
५) नालाकाठास हरळी अथवा स्थानिक गवताचे जैविक अस्तरीकरण करावे व नालाकाठावर वृक्ष लागवड करावी
६) ज्या नाल्याच्या पाणलोटातील upper & middle reaches मधील क्षेत्रीय उपचार व ओघळ नियंत्रणाची कामे पूर्ण  झाली  आहेत अशा नाल्यावरच खॊलीकरणाचे काम करावे. म्हणजे त्या नाल्यात पुन्हा गाळ येणार नाही (आकृती क्र २)
जलसंधारण विभाग
क्र. जलसं-२०१२ /  प्र. क्र.१  / जल-७ दि.
१२ नोव्हेंबर २०१३


नाला खोलीकरणासह साखळी सिमेंट कॉंक्रिट नाला बांध : CNB एकत्रित मार्गदर्शक सूचना
संकल्प चित्र:
सिमेंट कॉंक्रिट नालाबांधाची कामे M-10 संधानकाऎवजी  M-15 संधानकात करावीत व त्याकरिता अधीक्षक अभियंता, दगडी धरण मंडळ, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिक यांचे पत्र क्र. मसंसं / दध-१ / साठवण बंधारा / २४४ /२०१३ दि. १९ ऑगस्ट २०१३ अन्वये निश्चित केलेल्या संकल्प चित्राचा वापर करावा.

सिमेंट नाला बांधात गाळ जमा होऊ नये म्हणून:
१) त्या नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात दोन गॅबीयन बंधारे बांधावेत.
२) पाणलोट क्षेत्रात पडीत किंवा सरकारी जमीन असेल तर खोल सलग समतल चर हा उपचार घ्यावा
३) नाला खोलीकरण केल्यानंतर काठावर टाकण्यात आलेल्या मातीवर मनरेगा योजनेतून वृक्ष लागवड करावी.त्यामूळे नालाकाठांना बळकटी येईल.

अधीक्षक अभियंता, दगडी धरण मंडळ, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिक यांनी पत्र क्र. मसंसं / दध-१ / साठवण बंधारा / २४४ /२०१३ दि. १९ ऑगस्ट २०१३ अन्वये जल संपदा विभागातर्फे  व्यक्त केलेली मते
१) सर्वसाधारणपणे बहुतांश ठिकाणी नाल्यास तीव्र उतार असल्याने बंधा-याच्या उर्ध्व बाजूस अपेक्षित साठवण क्षेत्र उपलब्ध होऊ शकत नाही.
२) नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडविला गेल्याने मोठ्या पुराच्यावेळी नाल्याच्या दोन्ही तिरांवर पाणी पसरून शेत जमीनीचे नुकसान होते. Out flanking मुळे जमीनीची धुप होते. अनाठायी दुरूस्ती खर्चात वाढ होते. शेतक-यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न उदभवतो.
३) काढलेला गाळ शेतकरी नेतीलच असे नाही.
४)  बंधा-यांची देखभाल व व्यवस्थापन शेतकरी करत नाहीत हा ४००००बंधा-यांबाबतचा अनुभव आहे.
५) सिमेंट बंधारे न बांधता  दिलेल्या तपशीलाप्रमाणे नाल्यातच डोह निर्मिती करावी





1 comment: