आभार!
‘जागल्या-द व्हिसल ब्लोअर’ या माझ्या ब्लॉगची दखल दै.लोकसत्ताने "वाचावे नेट - के" या सदरात घेतली ["अरेच्चा...हे ही ब्लॉगर झाले!", दि. २३ एप्रिल २०१२].
लोकसत्ता व सदराचे लेखक अभिनवगुप्त यांचा मी आभारी आहे.
ब्लॉगवर मूळ व ताजे लिखाण असावे हा अभिनवगुप्त यांचा मुद्दा योग्य आहे. त्यादृष्टीने मी अर्थातच प्रयत्न करेन. माझे संकेतस्थळ सुरु झाल्यावर ती अडचण दूर होईल. पण तो पर्यंत पाणी या विषयावरील माझे लेखन जास्त लोकांपर्यंत त्वरित घेऊन जाण्यासाठी ब्लॉगचा उपयोग अजून काही काळ करावा लागेल.
"पाणी मागतात....च्यायला" या माझ्या कवितेस अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला. मी सर्वांचा आभारी आहे. पाणी प्रश्नाबाबत सगळे किती संवेदनशील आहेत हे त्यातून जाणवते.
मार्च व एप्रिल २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झालेले माझे तीन लेख ब्लॉगवर टाकतो आहे. वाचकांनी त्यांची दखल घ्यावी ही विनंती. लेखात उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत आपण सर्वजण मिळून मे महिन्यात काही कृति करु शकलो तर चांगले होईल. कृपया विचार व्हावा.
No comments:
Post a Comment